मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय

मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय

अजित पवारांची नारायण राणेंवर टिका

हिंगोली ( वसमत ) : नारायण राणेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून जो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राहिलेला माणूस आज हातात कटोरा घेवून उभा आहे आणि दे माय दे माय..मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मात्र थांबा जरा सांगून थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते…थांब माझ्या बाळाला पावडर लावतो तसं मुख्यमंत्र्यांचं सुरु आहे…असा खेळ राज्यात मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुरु असल्याची घणाघाती टिका विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमतच्या जाहीर सभेत केली.

ते पुढे म्हणाले की, नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला एवढी केविलवाणी अवस्था करुन घ्यावी लागली आहे. हताश झालेले माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मला मंत्री करा. अशी अवस्था झाली आहे. सभागृहात एवढं वजन असलेला नेता का वाकतोय हेच कळेना अशीही टिका पवार यांनी केली.राज्यातील जनतेसाठी जे जाहीर केले आहे ते माझ्या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Previous articleयंदाचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर
Next articleमनोहर जोशी, सुधीर जोशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here