शिवसेना विधानसभा, लोकसभा निवडणूका  स्वबळावर लढवणार

शिवसेना विधानसभा, लोकसभा निवडणूका  स्वबळावर लढवणार

मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी देण्यात आली असून, युवा सेनेचे अध्यक्ष  आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढवाव्यात हा ठराव या बैठकीत मांडण्यात आला.यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडण्यापूर्वी या बैठकीत युवासेनेचे अध्यक्ष  आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Previous articleमंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या ८४ वर्षाच्या शेतक-याची प्रकृती गंभीर
Next articleवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here