युतीचे सरकार पाच वर्षांचा कालावधीही पूर्ण करेल

युतीचे सरकार पाच वर्षांचा कालावधीही पूर्ण करेल
मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुंबई दि. २३ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची शिवसेनेच्या घोषणेची दखल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी बोलल्या आहेत. पण सध्या तरी आमची युती आहे, आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना देशातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून, वाट पाहूयात सध्या तरी मी यावर जास्त बोलणार नाही. पण आमचे युतीचे सरकार सध्या आहे, आणि हे सरकार पाच वर्षांचा आपला कालावधीही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर आगामी निवडणूका या युतीनेच लढविण्याची आमची भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर 2019 च्या लोकसभा, विधानसभांसाठी भाजप ही तयार आहे. महाराष्ट्रातील जनताही तयार आहे. नुकसान हे शिवसेनेच होईल अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleहुरडा खाऊ घालून शेतकऱ्यांनी अजितदादांचे केले स्वागत
Next articleतृतीयपंथी कल्याण मंडळाची १५ दिवसात स्थापना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here