पराभव होवूनही राहुल गांधीच “हिरो “
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. या निवडणूकीत काॅग्रेसचा पराभव झाला असला तरी राहुल गांधींची उंची मोदी आणि शहा यांच्यापेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे.
या व्यंगचित्रात १, २ आणि ३ असे क्रमांक रेखाटून त्यावर १ क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उभे राहिलेले दाखवण्यात आले आहेत. तर दुस-या क्रमांकावर राहुल गांधी दाखवण्यात आले आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उंची मोदी आणि शहा यांच्यापेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे. तर इतरांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असून, या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला मोठी टक्कर दिली.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राहुल गांधी यांचे महत्त्व गुजरातमुळे वाढल्याचे त्यांच्या व्यंगचित्रातून दाखवले आहे. गुजरात निवडणूक निकालावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.