राज्यात हिंदू धर्मात प्रवेश करणा-यांच्या संख्येत वाढ

राज्यात हिंदू धर्मात प्रवेश करणा-यांच्या संख्येत वाढ

मुंबई : महाराष्ट्रात नाव आणि जन्मतारीख या सोबत धर्म बदलण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या एका ताज्या माहितीच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात मुस्लिम धर्माचा त्याग करत ८७ टक्के लोकांनी हिंदू धर्मात प्रवेश करत हिंदू धर्माचा स्विकार केला आहे तर; हिंदू असलेल्या ६९ टक्के लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत विविध धर्माचा पर्याय निवडला आहे ज्यात ५७ टक्के लोकांनी मुस्लीम धर्मात प्रवेश केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या शासकीय प्रेस, लेखन साम्रगी आणि प्रकाशन संचालनालयाकडे धर्म परिवर्तनाची माहिती मागितली होती. या विभागाने अनिल गलगली यांस १० जून २०१४ पासून १६ जानेवारी २०१८ या दरम्यान लोकांनी केलेल्या धर्म परिवर्तनाची माहिती दिली. एकूण १ हजार ६८७ लोकांनी आप-आपल्या सोयीने धर्म परिवर्तन केले आहे.

धर्म बदलण्याची तुलना केली तर एकूण १ हजार ६८७ पैकी १ हजार १६६ हिंदु लोकांनी आपला धर्म बदलला आहे. यामध्ये सर्वाधिक ६६४ लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यानंतर २५८ लोक बुद्धिस्ट बनले आहे.१३८ ख्रिश्चन, ८८ जैन, ११ शीख आणि १ नव बुद्धिस्ट बनले आहे. हिंदूपासून मुस्लिम बनल्याची टक्केवारी ६१ आहे.  मुस्लिम पासून हिंदू बनल्याची टक्केवारी ८७ आहे. एकूण २६३ मुस्लिम पैकी २२८ लोक हिंदू बनले आहेत. तसेच १२ बुद्धिस्ट, २१ ख्रिश्चन आणि २ जैन बनले आहेत.

अन्य धर्मातील लोकांनी सुद्धा परिवर्तन केले आहे. १६५ ख्रिश्चनांनी धर्म बदलला आहे. सर्वाधिक १०९ लोक हिंदू बनले आहेत.११ बुद्धिस्ट, ५ जैन, ४७ मुस्लिम आणि २ जैन बनले आहेत. ५३ बुद्धिस्ट पैकी १७ हिंदू, १४ ख्रिश्चन ,१ जैन आणि २१ मुस्लिम बनले आहेत. १६ शीख पैकी २ ख्रिश्चन, २ जैन आणि १४ मुस्लिम बनले आहेत. ९ जैन पैकी २ हिंदू, २ ख्रिश्चन, ४ मुस्लिम आणि १ शीख बनले आहेत. ११ अन्य पैकी ६ हिंदू,  २ बुद्धिस्ट, १ जैन, १ मुस्लिम आणि १ शीख बनले आहेत. नव बुद्धिस्ट ४ होते त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करत शत प्रतिशत धर्म बदलला आहे.

Previous articleसरकार निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय घेईल
Next articleमहाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here