मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न

मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न

एकनाथ खडसे

रावेर (जळगाव) : मी कोणता भ्रष्टाचार केला असेल तर तो सरकारने जनतेसमोर आणावा असे आव्हान देतानाच, पक्ष सोडण्याचा विचार नाही पण पक्षातील लोक मला ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते या एकनाथ खडसे यांनी आज केला.

राजीव पाटील यांचा एकसष्टी गौरव सोहळा रावेर ( जळगाव) येथे पार पडला या कार्यक्रमाला काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण उपस्थित होते.मी कोणता भ्रष्टाचार केला मला याचे उत्तर हवे आहे. पक्ष सोडण्याची इच्छा नाही पण मला पक्षातून बाहेर ढकलले जात आहे असे सांगतानाच मला पक्ष सोडायला भाग पाडू नका असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.नाथाभाऊ तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार आहोत, ढकलण्याची वाट पाहू नका, असे काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण म्हणाले.या कार्यक्रमाला खडसे यांच्यासह विधानसभेचे आजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्‍वर जैन, आमदार भाई जगताप, आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

Previous articleखा. राजू शेट्टी यांनी घेतली धर्मा पाटील यांची भेट
Next articleमॅग्नेटिक महाराष्ट्र धोरण शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे