राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून भीमा कोरेगाव घटनेवर भाष्य
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अजून, एक व्यंगचित्र आपल्या फेसबुक वाॅलवर पोस्ट केले असून, भीमा कोरेगाव येथिल घटनेवर त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केले आहे.
भीमा कोरेगाव येथिल घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंद नंतर राज्यात झालेल्या हिंसाचारावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फटकारे ओढले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपण हा बॅकलॉग भरून काढू असे म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांनी व्यंगचित्रांची मालिका सुरू करून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी आजच्या व्यंगचित्रातून जातीपातीच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. यामध्ये बिन चेहऱ्याचे जातीपातीचे नेते दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याच म्हटले आहे. अरे..मी तुम्हाला सर्वांना बरोबर घेवून मोघलांशी लढलो.आणि तुम्ही एकमेकांशी लढत आहात.का तर त्या स्वार्थी नेत्यांसाठी,” या रे माझ्या लेकरांनो….त्या चिखलातून बाहेर” या अशी साद महाराज घालत असल्याचे दाखवले आहे. मराठा , दलित, ब्राम्हण एकमेकांशी भांडत असतानाच मोबाईलवर व्हाटसअपवर एक व्यक्ती कार्यरत असल्याचे दाखवून राज ठाकरे यांनी भीमा कोरेगाव घटनेवर भाष्य केले आहे.