शिवसेनेशिवाय भाजपचे किती खासदार निवडून येतात ते पाहू !

शिवसेनेशिवाय भाजपचे किती खासदार निवडून येतात ते पाहू !

मुंबई : राज्यात शिवसेना होती म्हणून भाजपला आज ‘अच्छे’ दिवस दिसत आहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटे होती पण आता ते विसरा, २०१९ चे घोडामैदान लांब नसल्याने शिवसेनेशिवाय भाजपचे किती खासदार निवडून येतात ते पाहू असे आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला दिले आहे.

शिवसेनेने आगामी निवडणूका या स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपला लक्ष्य केले जात आहे. आजच्या सामनातून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला सरळ सरळ आव्हानच दिले आहे.

काय आहे अग्रलेखात….

महाराष्ट्रात शिवसेना होती म्हणूनच भाजपला आजचे ‘अच्छे’ दिवस दिसत आहेत. २०१४ च्या मोदी लाटेचे ठेवा बाजूला, आता २०१९ चे घोडामैदान लांब नाही. तेव्हा शिवसेनेशिवाय किती खासदार तुमच्या बळावर निवडून येतात ते पाहू. म्हणजे शिवसेना काय व कोण आहे त्याचे विराट दर्शन या ‘लाट’करांना होईल. बिल्डर व ठेकेदारीच्या पैशांतून सध्या जे राजकारण तरारले आहे ते टिकणारे नाही हे लक्षात घ्या. लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार उद्या होत्याचे नव्हते होतील व महाराष्ट्रात फक्त शंभर नंबरी भगव्याचेच खासदार, आमदार सोन्याप्रमाणे चकाकतील. त्यामुळे युती नसेल तर शिवसेनेचेच नुकसान होईल व आमचेच हात आभाळास टेकतील या भाकडकथांना आता काही अर्थ नाही. या थापा आहेत व दावोस येथे मोदी यांनी जी भयंकर थाप मारून जगास हसवून (किंवा हादरवून) सोडले तसेच हे आहे. हिंदुस्थानातील ६०० कोटी जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान करून सत्तेवर आणले असे मोदी जागतिक व्यासपीठावर बोलले. तसेच हे, म्हणजे भाजप नसेल तर शिवसेनेचे नुकसान होईल असे सांगण्यासारखे आहे. मित्रवर्यांनी आमच्या फायद्यातोटय़ाची चिंता करू नये. तुमचे ६०० कोटी मतदार सांभाळा. कारण हिंदुस्थानची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यामुळे उरलेले पावणेचारशे कोटी मतदार हे चंद्रावर किंवा मंगळावर आहेत व ते भाजपलाच मतदान करतात असा दावा असल्याने तिथेही आता पोहोचावे लागेल. कारण देशाच्या राजकारणात त्यांना.

Previous articleफडणवीस यांना लाज वाटली पाहिजे
Next articleसरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here