३० दिवसात व्याजासह मोबदला देणार
सरकारची नरेंद्र पाटील यांना लेखी हमी
मुंबई : विखरण ( धुळे) येथिल वृध्द शेतकरी धर्मा पाटील यांना जमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्यानी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचे काल रात्री निधन झाले.जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा देण्याचे लेखी आश्वासनात देणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली असता येत्या ३० दिवसात व्याजासह योग्य मोबदला देण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे.मात्र उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.
जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा देण्याचे लेखी आश्वासनात सरकार देणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली होती.त्यानुसार आज सरकारच्यावतीने धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना लेखी आश्वासन देण्यात आले असून, आपल्या समक्ष पंचनामा करून जो मोबदला येईल तो व्याजासह ३० दिवसात देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. धर्मा पाटील यांना कमी तर इतर शेतक-यांना जास्त मोबदला देण्याचा प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून, नियमानुसार ३० दिवसात मोबदला देण्याची हमी सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.आहे.मात्र उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.