भाजप आमदार देशमुख आमदारकीचा राजीनामा देणार

भाजप आमदार देशमुख आमदारकीचा राजीनामा देणार

चंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची भूमिका घेत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणारे आणि मुख्यमंत्र्यावर नाराज असलेले भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख आमदारकीचा राजीनामा देणार आहेत त्याची घोषणा त्यांनी आज चंद्रपूरमध्ये केली आहे.

वेगळ्या विदर्भासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.मात्र त्याचे उत्तर मिळाले नसल्यामुळे आपला मुख्यमंत्र्यांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असे वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज येथे केले आहे. आमदार देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ आज चंद्रपुरात पोहचली आहे.आ. देशमुख यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू केली आहे.

Previous articleऔरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सरकारवर करणार ” हल्लाबोल”
Next articleकमला मील अग्नितांडवातील संशयीत आरोपींची नार्को चाचणी करा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here