शिवसेना स्वबळावर लढणार आणि जिंकणार

शिवसेना स्वबळावर लढणार आणि जिंकणार

औरंगाबाद : यापुढील प्रत्येक निवडणुका या स्वबळावरच लढणार आणि त्या जिंकणारच असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. पैठण येथिल शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. गेली
२५ वर्ष भाजपला सांभाळले. एवढेच नव्हे तर प्रत्येक वेळी त्यांना मदत केली. मात्र आता यापुढे शिवसेना स्वबळावरच लढणार आणि विजयी होणार आहे.स्वबळावर लढल्यानंतर नुकसान कोणाचे होणार हे येत्या निवडणूकीत कळेलच. घरात घुसायला लागलात. आता सोडणार नाही इशाराही त्यांनी भाजपला दिला. शेतकरी हा अन्नदाता आसल्याने त्याला कर्जमुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आत्ता जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे. पण तुम्ही २०२२ पर्यंत राहणार आहात का, तुमचा निकाल जनताच लावणार आहे. नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. कसलीही अंमलबजावणी केली जात नाही अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली.

Previous articleराष्ट्रवादीच्या हल्लाबोलमुळे औरंगाबाद शहर दणाणून गेले
Next articleछगन भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here