प्रकाश आंबेडकर यांचा आरोप बिनबुडाचा
नवाब मलिक
मुंबई : भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना वाचवले असा आरोप केल्यानंतर हा आरोप बिनबुडाचा असून, शरद पवार कधीच कोणत्याही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगून, त्यांनी हस्तक्षेप केला असता तर भुजबळ यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची अटक केली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या पक्षासोबत जावे हा त्यांचा अधिकार आहे. पण शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना वाचवले असा आरोप त्यांनी केला. तो बिनबुडाचा आहे. शरद पवार कधीच कोणत्याही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. जर त्यांनी हस्तक्षेप केला असता तर भुजबळ साहेबांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची अटक केली नसती. १९९९ ते २००४ च्या लोकशाही आघाडी सरकारात प्रकाश आंबेडकर सहभागी होते. त्यांच्या मंत्र्यांनी हा प्रश्न त्यावेळी का उपस्थित केला नाही? किंवा लोकशाही आघाडीच्या कोणत्याही बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता का? राजकारणात कोणत्या पक्षासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे हा त्यांचा अधिकार आहेच. पण भाजप, शिवसेना आणि पुरोगामी विचारांच्या पक्षापैकी आपला पहिला शत्रू कोण? हे त्यांना ठरवावे लागेल.