भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राज्यातील भुजबळ समर्थकांकडून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भुजबळ समर्थकांनी भेट घेवून आपले म्हणणे मांडले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राज्यातील भुजबळ समर्थकांकडून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर भुजबळ समर्थक विराट मोर्चा काढणार आहे.या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.यावेळी भुजबळ समर्थक माजी खासदार देवीदास पिंगळे, राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार शिरीष कोनवाळ,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे, जि.प.अध्यक्ष मायावती पगारे, पंढरीनाथ थारे, प्रकाश वडके, दिगंबर गिते, सुनिल मोरे, राधाकिसन सोनावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हेही उपस्थित होते.