अर्जुन खोतकर उस्मानाबादचे पालकमंत्री
मुंबई : राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्याकडे उस्मानाबादचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे.यापूर्वी हे पद शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे होते.
या अगोदर अर्जुन खोतकर यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्रीपद होते.मात्र नांदेडचे पालकमंत्रीपद पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे सोपवण्यात आल्याने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या जागी राज्यमंत्री खोतकर यांना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडील औरंगाबादचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर रामदास कदम यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. या पूर्वी नांदेडचे पालकमंत्रीपद अर्जुन खोतकर यांच्याकडे होते.आता खोतकर यांना उस्मानाबादचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.