दोन्ही काॅग्रेसची आघाडी पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेणार

दोन्ही काॅग्रेसची आघाडी पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेणार

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. आजच्या बैठकीत दोन्ही पक्षात आघाडी करण्याबरोबरच लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वाटाघाटी करण्यात झाल्या.आघाडी करावयाची असल्यास ती कशी असावी यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी प्राथमिक स्तरावर चर्चा केली.पुढील निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काॅग्रेसच्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,धनंजय मुंडे,माणिकराव ठाकरे,जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये काही मतभेद सोडून धर्मनिरपेक्षतेसह भाजप विरोधी मुद्यावर एकत्र येण्याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षात आघाडी करायची असल्यास ती कशी असावी याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चाचपणी केली.मात्र अंतिम निर्णय हि वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

Previous articleजातप्रमाणपत्र पडताळणीसाठी ग्रा.पं.सदस्य, सरपंचांना मुदतवाढ
Next articleशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here