मंत्रालयासमोर तरूणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न !
मुंबई : अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने काही वेळापूर्वी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने पोलिसांनी अविनाश या तरूणाला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
अहमदनगर येथिल अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने मंत्रालया गार्डन प्रवेदद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे याने सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी परीक्षा दिली होती. मात्र याबाबत सरकारने कसलाही निर्णय घेतल्याने अविनाश वारंवार मंत्रालयात चकरा मारत होता.वारंवार मंत्रालयात फे-या मारून थकलेल्या अविनाशने आज मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगवार रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरूवात केली आहे. पःधरा दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृध्द शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण आठ दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. अनेक नाडलेले प्रकल्पग्रस्त आपल्या व्यथा थेट मंत्रालयात घेवून येत असल्याने मंत्रालय सुरक्षेवर असणा-या पोलीसांवर मोठा ताण पडत आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका तरूणाला किटकनाशकासह पोलीसांनी ताब्यात घेतले होते.