कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला

कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला

मुंबई : पाकिस्तान प्रश्नावरून शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली असतानाही कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार घेतला आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात..

पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत.

Previous articleविश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
Next articleएक दिवस सर्वांना दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here