मंत्रालय सहाव्या मजल्यावरून तरूणाने उडी मारली

मंत्रालय सहाव्या मजल्यावरून तरूणाने उडी मारली

मुंबई दि. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. आज सहा वाजता हर्षल सुरेश रावते या तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीसांनी तात्काळ या तरूणाला रूग्णालयात हलविले आहे.

धर्मा पाटील यांच्यानंतर आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा गंभीर प्रकार घडला असून,चेंबूर येथिल हर्षल सुरेश रावते या ४५ वर्षाच्या तरूणाने मंत्रालायाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली असून, तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरूण महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी नोकरी करीत असल्याचे त्याच्या जवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून समजते. या तरूणाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये मा. न्यायाधिश यांच्या नावाने अर्ज लिहिला आहे. अजून पर्यंत हा तरूणाने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही.

Previous articleतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे उद्या वितरण
Next articleमंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या तरूणाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here