उद्या दादरमध्ये आम्ही गोएंकारचे “गोवा फेस्टीवल”

उद्या दादरमध्ये आम्ही गोएंकारचे “गोवा फेस्टीवल”

मुंबई : आम्ही गोएंकार या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “गोवा फेस्टीवलला” उद्यापासून दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे सुरूवात होणार आहे. १० ते १२ फेब्रूवारी असे दोन दिवस चालणा-या या फेस्टिवलमध्ये  गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, गोव्यातील वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने या फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे. १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टीवल होणार आहे. या दोन दिवसाच्या महोत्सवात पन्नास स्टॉल्स असून  हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यत खुले राहणार आहेत.यामध्ये विविध स्पर्धा ,चर्चासत्र , संगीत, मनोरंजानाचे कार्यक्रम  आदीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या गोवा महोत्सवात रसिकांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.

महोत्सवेच उदघाटन उद्या १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सामाजिक कार्यकर्त्या मंगल वागळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मंगल वागळे व गीता कपाडिया याच्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर फळे व फळभाज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करावे याचे मार्गदर्शन पिंकी खाबिया करणार आहेत. त्यानंतर  कोंकणी बोलण्याची स्पर्धा , कोंकणी साहित्याचे उगडास , गजाली  आणि गीता यासारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुटगुटीत बालकांची स्पर्धा , पाकस्पर्धा , टॅलेन्ट स्पर्धा,  संगीत कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  यंदा गोवा महोत्सवामध्ये भारती दानैत याचे एक्यूप्रेशर  हे खास वैशिष्ट्य असणार आहे. गोवा महोत्सवाचे आकर्षण तेथील विविध प्रकारचे स्टॉल्स असणार असून  रसिकांना या महोत्सावात गोवाचे वैशिष्टय असलेली कलाकुसरी पाहायला व खरेदी करण्याचाही आनंदही मिळणार आहे. तसेच खाद्यप्रेमींसाठी गोव्याचे प्रसिद्ध असलेले माश्याचे विविध प्रकाराच्या पाककृतीच्या चवीचा आस्वादही मिळणार आहे.

Previous articleमंत्रालयात आत्महत्या केलेला हर्षल रावते कोण होता ?
Next articleउत्तम खोब्रागडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here