” गोवा फेस्टीवल २०१८ ला” मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

” गोवा फेस्टीवल २०१८ ला” मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : आम्ही गोयांकार या संस्थेतर्फ़े आयोजित गोवा फेस्टिवल सोवल्याचे उद्घाटन गोव्याच्या प्रसिद्ध समाजसेविका मेघना वागले यांच्या हस्ते दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आले. यंदाच्या वर्षी गोवा फेस्टिव्हलला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या वेळी या संस्थेचे अध्यक्ष संजय हेगडे, सागर सावर्डेकर, गीता कपाडिया आणि माजी उपमहापौर अल्का केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक सेवा संघाच्या बालविध्याठ्ठी याच्या इशस्तवन व अथर्वशीर्ष झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल झाले व उपस्थित मान्यवरांचे सन्मान अध्यक्ष संजय हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर मान्यवरांचे भाषण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय हेगडे म्हणाले की, गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मितीसाठी व तेथील वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने या गोवा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी मंगला वागळे व गीता कपाडिया याच्यांशी अल्का केरकर आणि संवाद साधला. त्यानंतर फळे व फळभाज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करावे याचे मार्गदर्शन पिंकी केले. त्यानंतर कोंकणी बोलण्याची स्पर्धा , कोंकणी साहित्याचे उगडास , गजाली आणि गीता यासारखे कार्यक्रम सादर झाले तसेच भरती दानेत यांचे ऍक्युप्रेशर मार्गदर्शन केले. या फेस्टिवल मध्ये कला, फॅशन, गृहोपयोगी वस्तू, हस्तकला तसेच गोवंन पद्धतीचे सी फूडच्या विविध प्रकार खवय्यांना आकर्षित केले.

यंदाच्या वर्षी फेस्टिव्हलला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. एवढा मोठा प्रतिसाद मिळेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती असे आम्ही गोयांकार संस्थेचे सचिव सागर सावर्डेकर म्हणाले.

Previous articleमंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा!
Next articleमराठा समाजाच्या विराट दर्शनासमोर सरकार नतमस्तक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here