मंत्रालयातील आत्महत्या टाळण्यासाठी नायलाॅन जाळीचे कवच

मंत्रालयातील आत्महत्या टाळण्यासाठी नायलाॅन जाळीचे कवच

मुंबई : गेल्या आठवड्यात हर्षल रावते या पॅरोलवर असणा-या तरूणाने मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर मंत्रालयातील संभाव्य घटना टाळण्यासाठी मंत्रालयात नायलाॅनच्या जाळ्या बसवण्यात येत आहेत.

गेल्या काही दिवसात मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. जमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात विष प्राशन केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे रूग्णालयात निधन झाल्याची घटना ताजी असतानाच हर्षल रावते या तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्यांच्या घटना लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारतीला नायलाॅनच्या जाळ्या बसवण्याचे काम सध्या सुरु आहे. आज पासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

Previous articleटाळ-मृदुंगाच्‍या गजरात भाजपाच्‍या गरीब रथाची सुरूवात
Next articleसैन्यदलाच्या अवमानाबद्दल मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here