आज सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार !

आज सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार !

मुंबई   : शासनाने  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा महाशिवरात्रीची सुट्टी असूनही मंगळवार दि. १३ फेब्रुवारी  रोजी सुरु राहणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील माहिती बँकेकडील माहितीशी न जुळल्याने कर्जमाफीचा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही, अशा शेतकऱ्यांची अचूक माहिती त्यांच्याकडून घेवून बँकेकडील माहितीशी ताळमेळ घालून अचूक माहिती बँकांनी त्यांच्या पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना बँकाना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 फेब्रुवारी रोजी बँकांना दि. १३ फेब्रुवारीपर्यंत खातरजमा करुन अचूक माहिती पोर्टलवर भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार या बँका कर्जमाफी योजनेच्या कामाकरिता महाशिवरात्रीच्या सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवून दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार आहेत.

Previous articleमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोंदींवर निशाणा !
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here