नारायणगड, गहिनीनाथ गडासाठी पंकजाताई मुंडेंनी तातडीने दिले २ कोटी

नारायणगड, गहिनीनाथ गडासाठी पंकजाताई मुंडेंनी तातडीने दिले २ कोटी

दोन्ही तीर्थक्षेत्राला २५ कोटीचा विकास आराखडा झालाय मंजूर

मुंबई : बीड जिल्हयातील नारायणगड आणि गहिनीनाथ गड या दोन्ही तीर्थक्षेत्रासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तातडीने दोन कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीची प्रशासकीय मान्यताही त्यांनी आज प्रदान केली. या दोन्ही गडांच्या विकासासाठी प्रत्येकी २५ कोटी रूपयांचा आराखडा मागील महिन्यात मंजूर करण्यात आला होता.

धाकटी पंढरी म्हणून ओळखला जाणारा नारायण गड आणि संत वामनभाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेला गहिनीनाथ गड हे दोन्ही तीर्थक्षेत्र बीड जिल्हयाचे श्रध्दास्थान असून लाखो भाविक याठिकाणी येत असतात. या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश केला होता, एवढेच नव्हे तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार व शिखर समितीच्या बैठकीत या दोन्ही गडासाठी प्रत्येकी २५ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता.

दोन कोटी तातडीने दिले
————————–
ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मंत्रालयात या दोन्ही तीर्थक्षेत्राची फाईल मागवून घेतली व प्रत्येकी दोन कोटी रुपये निधी वितरण करण्यास मान्यता देऊन कामास प्रशासकीय मान्यताही प्रदान केली. उद्या नारायण गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना पंकजाताई मुंडे येणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. गडांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्ही गडांच्या विश्वस्तांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

Previous articleसरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा
Next articleअधिकृत चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांना’झोपु’तून घरे देण्याचा प्रस्ताव !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here