छोटा मोदी बोलले तरी कारवाई करता मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई ?

छोटा मोदी बोलले तरी कारवाई करता मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई ?

धनंजय मुंडे यांचा सवाल

अकोले/कोपरगाव : भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला आहे. हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोलले तर सरकारकडून कारवाईची धमकी देता मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा संतप्त हल्लाबोल सवालविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अकोले व कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या सभा संपन्न झाल्या. यावेळी मुंडे यांनी सरकारवर आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ.. अशी जाहीरातबाजी करत सत्ता मिळवलेला भाजप पक्ष हा फक्त सत्तेसाठी महाराजांच्या नावाचा वापर करतो. पण त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. म्हणूनच वारंवार शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपचे लोक करत असतात, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांना नोटीसा पाठवणारे सरकार भाजपच्या लोकांवर आता काय कारवाई करणार ? हे आता महाराष्ट्र पाहतोय, असेही ते म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल अपशब्द काढलेला उपमहापौर श्रीपाद छिंदंम हा rss चा तृतीय पदवीचा कार्यकर्ता आहे.म्हणजे यावरूनच शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रीय सेवा संघाचे विचार काय आहेत हे समजते असा हल्लाबोल त्यांनी केला. राजीनामा , निलंबन करून भागणार नाही तर महाराजांबद्दल वाईट बोलणारी प्रवृत्ती संपली पाहिजे असे ते म्हणाले

Previous articleसरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!
Next articleरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here