माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन
श्रीरामपूर : काँग्रेसचे माजी आमदार आणि शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत मुरलीधर ससाणे यांचे आज पहाटे श्रीरामपूर येथे निधन झाले.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे आज पहाटे श्रीरामपूर येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.साई आश्रम भक्त निवास, प्रसादालाय, शहरातील रस्त्यांचे भूसंपादन, विमानतळ उभारणीसाठी निधी ही महत्वाचे कामे त्यांनो श्री साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केली आहेत.काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात ससाणे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीरामपूर येथे भेट घेतली होती.