सुप्रियाताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाईची तिलाही झळ

सुप्रियाताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाईची तिलाही झळ

अमळनेर : खरे वाटणार नाही ना पण हे खरे आहे. हा किस्सा स्वतः सांगितला आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. अमळनेर येथील सभेत त्या म्हणाल्या, माझी आई सामान्य गृहिणी असून ती आज देखील पिशवी घेऊन बाजारात भाजी विकत घ्यायला जाते. स्वतः गॅस बुक करते. आज भाजीपाल्यापासून गॅस पर्यंत महागाई वाढलेली आहे. तेव्हा आई मला म्हणते, ‘तुमच्या काळात एवढी महागाई नव्हती, आज खुपच महागाई असून, पैशांची बचतच होत नाही’, असा किस्सा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितला.

उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आज अमळनेर येथे सभेसाठी त्या उपस्थित असताना बोलत होत्या. “काहींचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की शरद पवार यांची बायको बाजारात स्वतः भाजी आणायला जाते. आघाडी सरकारची सत्ता होती तेव्हा टिव्हीवर भाजपची जाहीरात लागायची, ‘बोहोत हुई मंहगाई की मार… ” तेव्हा आई म्हणायची तुमच्या राज्यात किती महागाई झाली”. मी आणि साहेब गपचूप ते ऐकून घ्यायचो, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

त्या पुढे म्हणाल्या, “सध्या तथाकथित अच्छे दिनचे राज्य आले आहे, तेव्हा मी तिला विचारते की आज काय परिस्थिती आहे. तर ती म्हणते, जुनी परिस्थितीच चांगली होती. तुमच्या राज्यात बचत व्हायची ती देखील आज होत नाही”. हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित महिलांमध्ये एकच हशा पिकला, जणू प्रत्येक घरातील परिस्थिती सुप्रियाताई कथन करत होत्या.

Previous articleशिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक केव्हा होणार?
Next articleगोडबोल्यापेक्षा कडक बोलणारा माझा दादाच चांगला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here