शरद पवारांची जामनेरच्या सभेत व्हर्च्युअल हजेरी

शरद पवारांची जामनेरच्या सभेत व्हर्च्युअल हजेरी

पवारांच्या ऑनलाईन हजेरीने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्प्यातील अठरावी सभा आज जामनेर येथे झाली. हल्लाबोल यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पक्षाचे सर्वच नेते हजेरी लावतात. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोपाची सभा होत असते. मात्र आज जामनेर येथील सभेत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यामार्फत मोबाईलमधून विडियो कॉलिंगद्वारे शरद पवार यांनी जामनेरच्या सभेला व्हर्च्युअल हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी मोबाईल जनतेच्या दिशेने दाखवताच कार्यकर्त्यांनी प्रंचड घोषणा देत जल्लोष करायला सुरुवात केली.
भाजपमधील व मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आज हल्लाबोल सभा होत आहे. या सभेसाठी लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंत्र्यांनी स्ट्रिट लाईट घालवली, पण स्ट्रिटवरची गर्दी हटवू शकले नाहीत

शहापूर नाका ते सभास्थळी असा दोन किमींची रॅली निघाली होती. पण यावेळी रस्त्यावरच्या स्ट्रिट लाईट घालवलेल्या होत्या. राष्ट्रवादीचा रोड शो फ्लॉप व्हावा यासाठी काही जणांनी स्ट्रिट घालवण्याची तरतूद केली होती. मात्र ते स्ट्रिट वर जमलेली तुफान गर्दी घालवू शकले नाहीत.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रंचड गर्दी करत जामनेर वासीयांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वागत केले.

आणि सभेचा अचानक नुर बदलला

जामनेर मधील सभेला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली होती. गिरीश महाजन यांच्या बाजूने ते घोषणा देत होते. प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही घोषणा द्यायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशी अवस्था असतानाच पवार साहेबांच्या व्हर्च्युअल हजेरी नंतर सभेचा अचानक नुरच बदलला. घोषणाबाजी बंद झाली. जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या विरोधात केलेल्या घणाघाती भाषणांना लोकांनी जोषात प्रतिसाद दिला.

Previous articleगिरीषभाऊ…. मौका सभी को मिलता है !
Next articleकार्यकर्त्याला हात लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here