विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काॅग्रेसची बैठक

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काॅग्रेसची बैठक

मुंबई : आगामी विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज दुपारी ३ वाजता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने विधान परिषद निवडणूकीवर चर्चा करण्यात येणार आहे.

येत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये विधानपरिषेतील एकूण २१ सदस्यांची मुदत संपत असून, आगामी विधानपरिषद निवडणूकीबाबत चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरविण्यासाठी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज ३ वाजता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होत असून, या बैठकीला काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण , राधाकृष्ण विखे पाटील , पृथ्वीराज चव्हाण , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , अजित पवार , धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक प्राधिकारी संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आलेले दिलीप देशमुख ( काॅग्रेस ) , जयवंतराव जाधव, बाबाजानी दुर्राणी ( राष्ट्रवादी ), प्रविण पोटे (भाजप), मितेश भांगडिया ( भाजप)यांची येत्या २१ जून २०१८ रोजी तर ३१ मे २०१८ रोजी राष्ट्रवादीचे सदस्य अनिल तटकरे यांची मुदत संपत आहे. पदवीधर कोकण विभागातून विधानपरिषदेवर निवडून आलेले राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे आणि मुंबई पदवीधर विभागातून विधानपरिषदेवर निवडून आलेले डाॅ .दिपक सावंत हे यांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. त्याच बरोबर शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर गेलेले लोकभारतीचे कपिल पाटील आणि नाशिक विभागातून विधानपरिषेवर गेलेले डाॅ.अपूर्व हिरे यांची मुदत येत्या ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे.

महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारा विधानपरिषदेवर गेलेल्या एकूण ११ सदस्यांची येत्या २७ जुलै रोजी मुदत संपत आहे. त्यामध्ये माणिकराव ठाकरे , संजय दत्त , शरद रणपीसे ( काॅग्रेस ) , जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील , अमरसिंह पंडीत, सुनिल तटकरे ( राष्ट्रवादी ),विजय गिरकर , महादेव जानकर ( भाजप ), अनिल परब ( शिवसेना ) जयंत पाटील ( शेकाप ) यांचा समावेश आहे.

Previous articleघारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचे डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण
Next articleबाळासाहेबांच्या अटकेवेळी’ कुठे गेली होती ‘आपुलकी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here