राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांना उमेदवारी

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांना उमेदवारी

मुंबई : येत्या एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २३ मार्च रोजी निवडणूक होत असून, शिवसेनेने विद्यमान राज्यसभा सदस्य अनिल देसाई तर राष्ट्रवादीने विद्यमान राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान होणार असून, कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील सदस्यांमध्ये वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे. यापैकी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने वंदना चव्हाण यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.

Previous articleआर्थिक मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या
Next articleमुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलमधून प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here