भुजबळ अशक्तपणा आणि खोकल्याने त्रस्त !

भुजबळ अशक्तपणा आणि खोकल्याने त्रस्त !

आठ दिवसात १० किलो वजन कमी झाले

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी गेल्या दोन वर्षापासून कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. प्रचंड अशक्तपणा आणि खोकल्यामुळे त्यांना रात्रभर त्यांना झोप येत नाही.

छगन भुजबळ सध्या आर्थर रोड तुरुंगात असून गेल्या आठ दिवसांमध्ये भुजबळांचे वजन दहा किलोने घटले आहे.  भुजबळ यांनी प्रचंड अशक्तपणा आला असून, खोकल्यामुळे त्यांना रात्रभर झोप लागत नाही नाही. काल ईडीच्या न्यायालयात तारखेसाठी भुजबळ यांना आणण्यात आले असता त्यांच्या भेटीसाठी आलेले आमदार जयवंत जाधव, उत्तरप्रदेशचे माजी मंत्री बाबूसिंग कुशवाह, राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, रवींद्र पगार, दिलीप खैरे यांनी ही माहिती दिली.

Previous articleमुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलमधून प्रवास
Next articleसरकार त्या दोन व्यक्तीसमोर हतबल का आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here