नारायण राणेंना विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही !
आ. नितेश राणे यांचे ट्विट
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिल्ली भेटीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नारायण राणे हे राज्यसभेठी तयार असल्याची चर्चा असतानाच नारायण राणे यांच्या हितचिंतकांना असे वाटते आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी रहावे, महाराष्ट्राला नारायण राणेंसारख्या नेत्याची गरज आहे. आम्हाला त्यांना विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही. असे ट्विट आ. नितेश राणे यांनी केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर स्मित हास्य करीत परतणारे नारायण राणे राज्यसभेसाठी राजी झाल्याची चर्चा होती. त्यांना भाजपातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपची ही ऑफर नारायण राणे यांना अमान्य असल्याचे दिसते . नारायण राणेंचे पुत्र आ. नितेश राणे यांनी आज एक ट्विट करून आपली इच्छा व्यक्त केली आहे.‘नारायण राणेंच्या हितचिंतकांना असे वाटते आहे की, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी रहावे, महाराष्ट्राला नारायण राणेंसारख्या नेत्याची गरज आहे. आम्हाला त्यांना विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही. असे ट्विटमध्ये नितेश राणे यांनी म्हटले आहे.या ट्विटनंतर राणेंनी भाजपाची राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याची चर्चा आहे.
भाजपाकडून राज्यसभेची ऑफर असल्याचे नारायण राणे यांनीच काल स्पष्ट केले होते .येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपाचे तीन उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून येवू शकतात. त्यापैकी एक जागा नारायण राणेंना द्यायची असा प्रयत्न भाजपातर्फे सुरु आहे. मात्र आ. नितेश राणे यांनी केलेले ट्विटमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.