पंकजाताई मुंडे दिव्याज फाउंडेशनच्या वुमन ऑफ वंडर अँचिव्हर्स अवार्डने सन्मानित
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास,महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना आज दिव्याज फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा राजकीय क्षेत्रातीत उत्कृष्ट कामाबद्दल वुमन ऑफ वंडर अँचिव्हर्स अवार्ड २०१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास ,महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यानी पुरस्कार स्वीकारतांना म्हणाल्या की, हा पुरस्कार आदर्श महिला राजकारणी व मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला आहे म्हणून या पुरस्काराला विशेष महत्व आहे.
मंत्री पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, वडील लोकनेते गोपीनाथ मुंडे असतांना मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व जलसंधारणाची विविध सामाजिक कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.आता मी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.