“साहेब” हे अचानक कुठून उगवले ?

“साहेब” हे अचानक कुठून उगवले ?

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून व्यंगचित्र रेखाटून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. दक्षिणेतील अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर अभिनेते कमल हसन यांनीही राजकारणात प्रवेश केला. याच प्रवेशावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातुन भाजपाला लक्ष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात तामिळनाडू नावाचा एक तलाव रेखाटून या तलावात एक मोठे कमळ उगवले असल्याचे दाखवले आहे. या कमळाच्या पानांवरच ‘कमल’ असे लिहिले आहे. मात्र कमळाच्या पाकळ्यांवर तामिळ अस्मिता असे लिहून, कमळाच्या मध्यभागी अभिनेते कमल हसन उभे असल्याचे रेखाटले आहे. त्यासोबतच तलावात आजून एक छोटे कमळही दाखवलेले आहे. ते कमळ भाजपाचे आहे. तलावाच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उभे आहेत आणि शहा पंतप्रधानांना म्हणतात “साहेब, हे अचानक कुठून उगवले आता?” असे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

Previous articleपंकजाताई मुंडे दिव्याज फाउंडेशनच्या वुमन ऑफ वंडर अँचिव्हर्स अवार्डने सन्मानित
Next articleकोरेगाव भीमा दंगलीतील आपदग्रस्तांना ५ लाख ७५ हजाराची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here