छगन भुजबळ उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल

मुंबई : महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेच्या अाराेपाखाली
आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोटदुखी आणि अस्थमावर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन वर्षापासून विविध अाराेपाखाली तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेच्या अाराेपाखाली भुजबळ व त्यांचे पुतणे समीर दाेन वर्षापासून तुरुंगात अाहेत. गेल्याच आठवड्यात भुजबळ यांना प्रकृती संदर्भात आपल्या जवळच्या व्यक्तींकडे याबाबत तक्रार केली होती. काल त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने
त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखी आणि अस्थमाच्या त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Previous articleकोरेगाव भीमा दंगलीतील आपदग्रस्तांना ५ लाख ७५ हजाराची मदत
Next article२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here