“छत्र” उभारण्याची कुवत नसेल तर शिवसेना रायगड उभा करेल !
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा इशारा
मुंबई : मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छ.शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यासाठी छत्र उभारले जावे अशी मागणी शिवसेना करत आहे.मात्र जीव्हीके, एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करते असल्याने तुमच्याकडे “छत्र” उभारण्याची कुवत नसेल तर शिवसेना रायगड उभा करेल असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिला.
या ठिकाणी शिवसेनेच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यासाठी छत्र उभारले जावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र जीव्हीके, एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आज शिवसेनेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने दरवर्षी या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येते त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख बोलत होते. छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होते आहे. तुमची कुवत नाही असे सांगा शिवसेना या ठिकाणी रायगडच उभा करेल असा इशारा ठाकरे यांनी दिला. हे छत्रही बसवण्याची कुवत नाही असे सांगा शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवरायांना मुजरा करण्यासाठी आपण दरवर्षी येथे येतो. शिवजयंती हा मराठी माणसासाठी दसरा, दिवाळी गुढीपाडव्या सारखा एक सण आहे. शिवसैनिक शिवजयंती एखाद्या सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे साजरी करतात याचा अभिमान वाटतो असेही शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले.