राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात

सातारा :  माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अंधारी फाटा येथे रविवार रात्री अपघात झाला. त्यांची गाडी खडीवरून घसरून झाडामध्ये अडकल्याने या अपघातातून आमदार शशिकांत शिंदे थोडक्‍यात बचावले आहे.

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शशिकांत शिंदे हे उपस्थित राहणार होते. रामेघर या ठिकाणी जाण्यास त्यांना उशीर झाल्याने त्यांच्या वाहन चालकाने गाडी वेगाने चालवली होती. सदर मार्गावरील रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झालेले आहे.या रस्त्यावर खडीचे लहान तुकडे होते. त्यावरून त्यांची गाडी घसरली. गाडीचा वेग जास्त असल्याने ती अंधारी फाट्याजवळील एका वळणावरून काही अंतर पुढे गेली. आ.शशिकांत शिंदे ज्या बाजूला बसले होते, ती बाजू समोर असणाऱ्या एका दरीकडे कलली. मात्र, दरीजवळ असलेल्या झाडांच्या मध्ये त्यांची गाडी जावून अडकली. त्याचवेळी आमदार शिंदे आणि त्यांच्या चालकाने गाडीतून तात्काळ उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला.

Previous articleमाजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा
Next articleपरिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here