ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात इनसिनिरेटर मशीनचे उद्घाटन

ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात इनसिनिरेटर मशीनचे उद्घाटन

मुंबई : ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सॅनिटरी नॅपकीनचे विघटन करणाऱ्या इनसिनिरेटर मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या इनसिनिरेटर मशीनचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, निर्मल रक्षा अभियान प्रकल्प अंतर्गत सिल्वरेज युटोपीअन कंपनी प्रा. लि. ने ही मशिन दिली आहे. या मशिनने वापरलेल्या नॅपकिनपासून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचारी यांचे वैयक्तिक आरोग्य यांना होणारा धोका विचारात घेता आधुनिक पद्धतीने पर्यावरण पुरक ईनसीनिरेटर पद्धतीचा वापर करून नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक इनसिनिरेटर मशीन मंत्रालयात प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आले आहे.

८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त शासनाच्या वतीने अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ लाख मुलींना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकीन विघटन करणे आवश्यक असल्याने अशा मशीन व अशा तंत्रज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी या मशीन सुरूवातीला मंत्रालयात बसविण्यात आल्या आहेत.

अस्मिता योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून इनसिनिरेटर मशीनचे जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात सीएसआरच्या माध्यमातून बसविण्यात येणार असल्याचे सांगून सॅनिटरी नॅपकीन विघटन करण्यासाठीच्या अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या मशीन परिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. यामध्ये विद्युतविना चालणाऱ्या मशीनचा समावेश केला जाणार आहे.

सिल्वरेज युटोपीअन कंपनी प्रा. लि. बद्दल मंत्री मुंडे म्हणाल्या की, या कंपनीने अहमदनगर, नागपूर, पुणे या ठिकाणी इनसिनिरेटर मशीन मोफत बसून दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी निर्मल रक्षा अभियानांतर्गत ही कंपनी काम करीत आहे.

Previous articleवैजापूर, जामनेर नगरपरिषदेसह चार नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान
Next articleसिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here