नारायण राणे राज्यसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

नारायण राणे राज्यसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे अखेर राज्यसभेवर जाण्यास तयार झाले असून,सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेसाठी भाजपकडून राज्यातून केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नारायण राणे यांनी आपला निर्णय जाहीर केला नव्हता त्यामुळे इतर दोन नावांची घोषणा करण्यात आली नाही मात्र अखेर नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असून, सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिस-या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा असून,त्यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे. वंदना चव्हाण( राष्ट्रवादी ) ,अनिल देसाई  ( शिवसेना), यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर काॅग्रेस पक्षाने अजून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली तरी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी ५ मार्चला अधिसूचना जारी  करण्यात आली असून, सोमवार दिनांक १२ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.१३ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा जागांसाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २३ मार्च मतदान घेण्यात येणार आहे.परंतु सध्या प्रत्येक पक्षाचे संख्याबळ बळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Previous articleमाजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन
Next articleकाॅग्रेसकडून डाॅ.रत्नाकर महाजन की राजीव शुक्लांना उमेदवारी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here