महाराष्ट्र हिंदुस्थानाला विचार देतो हा इतिहास घडवायचाय !
शरद पवार
रायगड : आपल्याला इथून पुढच्या काळात महाराष्ट्र चालवायचा आहे. हा महाराष्ट्र हिंदूस्थानाला विचारावर नेतो हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे असा जबरदस्त आशावाद राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रोहा येथील जाहीर सभेत कार्यकर्त्यांमध्ये भरला.
त्यांनी आपल्या भाषणामध्ये रायगडवासियांनी केलेल्या गौरवावर बोलताना हा गौरव बंद करा असे मी सांगत आलोय. मला ५० वर्ष मिळाली म्हणून माझा सत्कार केलात परंतु माझा सत्कार करु नका तर माझ्या जनतेचा सत्कार करा.त्यांचे उपकार आहेत.आपल्याला सामान्य माणसांची बांधिलकी ठेवायची आहे. त्यांची बांधिलकी ठेवली तर कितीही संकट आली तरी सामुहिक शक्तीने ती दुर करता येतात. या बांधिलकीमुळेच मला हे काम करता आले.महाराष्ट्राची शक्ती आम्हा सर्वांच्या पाठीशी राहते तेव्हा मराठी माणूस छातीचा कोट करुन लढण्यास सिध्द होतो.म्हणून या ११२ कोटी जनतेचा सन्मान व्हायला हवा.आणि म्हणून मी त्यांच्यासमोर कायम नतमस्तक होतो असेही पवार म्हणाले.
लातूरचा भूकंप झाला.अनेक लोकं दगावली. हे संकट आले त्यावेळी मी सकाळी ६ वाजता पोचलो होतो.एका वर्षात आम्ही तिथल्या लोकांची घरे बांधून दिली.त्यांची कुटुंब उभी केली. मुंबईत दंगल झाली.मुंबई पेटली असताना जगातील चॅनेल आली होती. परंतु मुंबईकरांनी जिद्द दाखवत सुरळीत कामावर गेली होती.त्यावेळी दंगलीचे सावटही जाणवलं नाही. म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकं उभे रहात आहेत याचा आनंद होत आहे.रायगडवासियांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही.तर सर्वसामान्यांची बांधिलकी आहे हे सिध्द होते.
शेकाप या जिल्हयाचा पक्ष आहे.त्यांनी आपल्याला मदत करायचे ठरवले आहे आणि आम्ही त्यांना मदत करत आहोत.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन शक्ती एकत्र आल्या तर या राज्याला,देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा आत्मविश्वास शरद पवार यांनी व्यक्त करतानाच रायगडचा प्रतिनिधी राष्ट्रवादीचा तुम्हा बसवाल कारण माझा तुमच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले.लहान माणसाच्या जीवनात परिवर्तन येईल असा प्रयत्न करुया.हिताच्या जपणुकीसाठी आमची ताकद,शक्ती पाठीशी राहिल असा विश्वासही व्यक्त केला.