काँग्रेसचे सर्व आमदार शेतकऱ्यांच्या पाठीशी!: विखे पाटील
मुंबई : “काहीही झाले तरी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. काँग्रेसचे सर्व आमदार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, सोबत आहेत…” या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकल्याने सरकारला जाग आली आहे. आता सरकार त्यांना चर्चेचे निमंत्रण देते. आहे. हाच समजूतदारपणा आधी का नाही दाखवला? असा प्रश्न उपस्थित करून १२ मार्च रोजी मुंबईत नियोजित शेतकरी मोर्चाला काँग्रेस पक्षाचे संपूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.