विश्वास पाटील यांच्यावरील आरोपांची सीआयडी मार्फत चौकशी

विश्वास पाटील यांच्यावरील आरोपांची सीआयडी मार्फत चौकशी

मुंबई : माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील झोपू योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज केली.

याप्रकरणातील १३७ पैकी ३३ फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झाल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी विधानसभेत सांगितले तर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती वायकर देवून यासंदर्भात निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी केली.मुंबईतील झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

Previous articleरोह्याचे दुसरं भोपाळ करायचं होतं का ?
Next articleलोकसेवा आयोगाच्या भरतीबाबत लवकरच निर्णय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here