शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याजवळ उभारली काळी गुढी

शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याजवळ उभारली काळी गुढी

मुंबई : शिक्षकांचे पगार रखडल्याच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेच्या पदाधिका-यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला.

मुंबईतील २७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याच्या कारणास्तव शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिका-यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या दरवाजाजवळ काळी गुढी उभारली उभारून निषेध व्यक्त केला.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याच्या दरवाजाजवळ ही काळी गुढी उभारून आंदोलन केले. मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी डी घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्त्यांनी ही काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला.

Previous articleमहाराष्ट्राला आजपर्यंत ७७४ पद्म पुरस्कार
Next articleराज ठाकरे आज कोणती घोषणा करणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here