हुक्का पार्लर बंद करण्यासाठी नवीन कायदा करणार

हुक्का पार्लर बंद करण्यासाठी नवीन कायदा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : हुक्का पार्लरच्या माध्यमातून नशेच्या वस्तू मुलांपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी प्राप्त  होत आहेत.  या पार्श्वभूमीवर राज्यातील हुक्का पार्लर बंद करण्यासाठी राज्य सरकार एक नवीन कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य  संजय दत्त  यांनी  मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या बारमध्ये भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सुचना विधानपरिषदेत मांडली होती.  यावर उत्तर देताना मुख्यमंत्री  बोलत होते. लोअर परेल  येथील कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो या दोन रेस्टोपबमध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी लागलेल्या भीषण आगीत  १४ जणांचा  मृत्यू झाला. या घटनेच्या चैाकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगररचनाकार आणि नगरविकास विभागाचे माजी सचिव यांची एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेमार्फत अग्नी सुरक्षा यंत्रणेची (फायर कम्पलायन्स) तपासणी करण्यासाठी ३० युनिटसची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून आगीपासून बचावासाठीची खबरदारी हॅाटेल, मॅालमध्ये, रेस्टॅारंटमध्ये घेण्यात येत आहे की नाही हे या युनिटमार्फत तपासण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

Previous articleअनुदानवाढीबाबत एका महिन्यात निर्णय घेणार
Next articleअंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here