थापा मारुन राज्य करण्याचे “स्किल” भाजपाने कमावले !

थापा मारुन राज्य करण्याचे “स्किल” भाजपाने कमावले !

मुंबई : काल माटुंगा -दादर दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या रेल रोकोवरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी देश लुटून पळून जातात, पण भूमिपुत्रांना रोजगारासाठी रस्त्यावर संघर्ष करावा लागत आहे. ‘स्किल’ कमावलेली रेल्वेची पोरे असली तरी थापा मारुन राज्य करण्याचे स्किल भाजपा सरकारने कमावल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकियमधून केली आहे.

पीएनबी बॅकेला गंडा घातलेला नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे लोक देशाची लूट करून पळून जात असतानाच भूमिपुत्र मात्र रोजगारासाठी रस्त्यावर संघर्ष करत आहे. ‘स्किल’ कमावलेली रेल्वेची पोरे बेकार बसली असली तरी ‘थापा’ मारून राज्य करण्याचे स्किल सरकारने कमावले अशा शब्दात भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. बुलेट ट्रेन, हाय स्पीड ट्रेनच्या घोषणा श्रीमंतांसाठी आहेत. मुंबईच्या रेल्वे मार्गावर उतरून आंदोलन करणारी मुले गरीबांची आहेत. एल्फिन्स्टनचा पूल लष्कराने बांधला तसे या मुलांचे प्रश्न लष्करच सोडवणार व तुम्ही सगळे आढय़ास तंगडय़ा लावून बसणार, अशी काही योजना आहे काय असा सवालही संपादकियमधून उपस्थित करण्यात आला आहे.

Previous articleप्लास्टिक बंदी: मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणणार
Next articleआम्ही पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here