३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे अध्ययन ३० एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचे राज्य  विद्या प्राधिकरणाने काढलेले पत्रक मागे घेण्यात येत आहे अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.

हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता. आवश्यकता भासल्यास पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्ट केले. परीक्षा संपल्या सुट्टीचा बेत करणा-या विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला होता. दरवर्षी परीक्षा संपली की उन्हाळी सुट्टी सुरू होते. १ मे रोजी निकाल लागल्यानंतर महिनाभर सुट्टी देण्यात येते. मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते नववीच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावी असे आदेश देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी होती. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांचे अध्ययन ३० एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचे राज्य  विद्या प्राधिकरणाने काढलेले पत्रक मागे घेण्यात येत आहे अशी घोषणा तावडे यांनी आज विधान परिषदेत केल्याने विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Previous article“महामित्र” अ‍ॅपवरील सर्व माहिती सुरक्षित
Next articleदारूबंदीसाठी वॉर्डातील मतदारांच्‍या ५० टक्‍केची अट तीन महिन्‍यात बदलणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here