कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड
इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. यांचा समावेश.
मुंबई : मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक ८ मे २०१८ ते १८ मे २०१८ या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- १) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), २) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), ३) पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन)या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी २६ मराठी चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. या २६ चित्रपटातून परिक्षण समितीने उपरोक्त ३ चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.
सदर परिक्षण समितीमध्ये १) रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), २)श्रीमती रेखा देशपांडे, (चित्रपट समिक्षक), ३) श्रीमती अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), ४) प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), ५) पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने या ३ चित्रपटांची निवड केली आहे.