१ मे २०१८ पर्यंत एस.टी. कामगारांचा वेतन करार करणार

१ मे २०१८ पर्यंत एस.टी. कामगारांचा वेतन करार करणार
दिवाकर रावते

मुंबई :  सुमारे १ लाख एस.टी.कामगारांचे लक्ष लागून असलेला वेतन करार १ मे, २०१८ रोजी होणार. अशी नि:संग्धीत घोषणा मा.परिवहन व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष  दिवाकर रावते यांनी केली. ते एस.टी. महामंडळाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या सर्व कामगार संघटनांच्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत कामगार वेतन करार कोण कोणत्या कारणांनी रखडला याची चर्चा न करता मान्यता प्राप्त संघटनेने सकारात्मक भुमिका घेवून एस.टी. प्रशासनाची चर्चा करावी, सदर चर्चा निष्फळ ठरल्यास मी स्वत: १ मे, २०१८ रोजी सर्व कामगारांना मान्य होईल असा सन्मानजनक वेतन करार जाहीर करेन. तसेच नव्या वेतन करारामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ६० हजार कनिष्ठ वेतन श्रेणी भोगलेल्या कामगारांना सन्मानजनक पगारवाढ मिळण्याच्या दृष्टीने तरतुद करण्यात येईल. या निमीत्ताने कामगार नेतृत्वाने वेतनवाढीच्या बाबतीत कामगारांच्या मध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एस.टी.महामंडळात कार्यरत असलेल्या सर्व नोंदणीकृत कामगार संघटनांना यावेळी निमंत्रीत करण्यात आले होते. सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची वेतन करारा संबंधी मते जाणून घेतल्यानंतर रावते यांनी सन २०१६ ते २०२० चा एस.टी. कामगारांचा वेतन करार हा ऐतिहासिक व सन्मानजनक होण्याच्या दृष्टीने मान्यता प्राप्त संघटनेसह सर्व संघटनांनी सकारात्मक प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  रणजित सिंह देओल यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच आमदार भाई जगताप यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमाझ्या मंत्रिपदाचा प्रत्येक क्षण परळीच्या विकासासाठीच 
Next articleखासदारकी म्हणजे गडचिरोलीला बदलीची शिक्षा समजू नये !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here