राज्य सहकारी संघाचा ‘शिक्षण निधी’ सुरू करण्याची मागणी

राज्य सहकारी संघाचा ‘शिक्षण निधी’ सुरू करण्याची मागणी

मुंबई : राज्य सहकारी संघाचा ‘शिक्षण निधी’ सुरू करावा, तसेच मजुर सहकारी संस्थांच्या शासनाच्या झालेल्या निर्णयाचा अध्यादेश लवकरात लवकर काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकांनी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकांनी भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व राज्य सहकारी संघाचा ‘शिक्षण निधी’ सुरू करावा, तसेच मजुर सहकारी संस्थांच्या शासनाच्या झालेल्या निर्णयाचा अध्यादेश लवकरात लवकर काढावा, अशी मागणी केली. या प्रसंगी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास तिडके, उपाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, बि.डी.पारले, रामकृष्ण बांगर, पांडुरंगकाका सोले -पाटील, प्रा. सुभाष आकरे, भाऊसाहेब कुर्‍हाडे, विद्याताई पाटील, विलास महाजन, गुलाबराव मगर, निगोंडा हुल्ल्याळकर यांसह सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, विठ्ठल भोसले उपस्थित होते.

Previous articleलोकांपर्यंत आता खरा विकास पोहोचतोय – ना. पंकजाताई मुंडे
Next articleभाजपाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here