भय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

भय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

भोपाळ : मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने भय्यू महाराज यांच्यासह राज्यातील पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

संतांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. नर्मदा नदीसाठी जनजागृती अभियान चालवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमध्ये पाच संत सदस्य आहेत. त्या पाचही जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारने या संदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. सरकारने राज्यातील विविध क्षेत्रे विशेषत: नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण, जल संरक्षण आणि स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यासाठी ही विशेष समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून नर्मदानंद, हरिहरानंद, कॉम्प्यूटर बाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. या पाचही संतांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Previous articleभाजपाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी 
Next articleराष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभांना तुफान प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here