तुम्ही तर छिंदमची अवलाद आहात !
अजित पवारांचा सामनातून समाचार
मुंबई : शिवसेना ही गांडूळाची अवलाद असल्याची टिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोल्हापूर येथिल हल्लाबोल सभेत केली होती. या टिकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातुन अजित पवार यांचा समाचार घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेला कोल्हापूरातुन सुरूवात झाली. कोल्हापूरात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी असणा-या शिवसेनेवर गांडूळाची अवलाद असल्याची टिका केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून पवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यात आले असून, गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला पडाला आहे, पण एवढी वर्षे सत्तेत राहून खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे
आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केली. हेच तुमचे शेतकरी प्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी साप म्हणणेहा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छ. शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल अशा शब्दात आजच्या सामनाच्या अग्रलेखातुन अजित पवार यांचा समाचार घेण्यात आला आहे.
अजित पवारांचे राजकारण हे आता बारामतीपुरते सुद्धा उरलेले नसून, गेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळ जवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महानगरपालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे पानीपत झाले. विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच आहे अशी टिकाहक करण्यात आली आहे.
काकांनी संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना त्यांच्या तोंड व जीभेमुळे नेतृत्व उभे करता आले नाही. काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे असा टोला लगावण्यात आला आहे.
स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय असा सवाल अग्रलेखात करण्यात येवून, शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरी प्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल , तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला. सत्तेत असताना काही केले नाही व विरोधी पक्षात असतानाही तोंडास बूच मारूनच बसले आहात अशा खरमरी शब्दात अजित पवार यांचा समाचार घेण्यात आला आहे.